ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजकावर हल्ला; गाव बंद ठेवून ग्रामस्थांकडून निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील युवा उद्योजक साई सात्रळ डेअरीचे संचालक चंद्रकांत डुक्रे हे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ शिवारात ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री अंत्यविधी वरून येताना

एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले असताना सात्रळ, सोनगाव येथील समाज कंटकांनी त्यांच्यावर ड्रायव्हर व सहकारी यांच्यावर हल्ला केला. या घटनेने सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशी मध्ये तीव्र पडसाद उमटले. या घटनेचा गुरुवारी गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला.

निषेध सभेत जि.प.चे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील म्हणाले की, या सामाज कंटकांवर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या गोष्टी गावाच्या हिताच्या नाहीत.

सर्वांनी गावामध्ये एकोपा जपण्यासाठी या गोष्टींना थारा देवू नये. बाळकृष्ण चोरमुंगे म्हणाले, झालेली घटना अतिशय निंदनीय असून काही समाज कंटकामुळे गावात दुषित वातावरण तयार होते. अशांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी.

दिलीप डुक्रे म्हणाले, या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशा समाज कंटकांना कोणत्याही राजकीय नेत्यांनी थारा देवू नये.

यावेळी किरण कडु, अहमद शेख, दत्तू पलघडमल, मुस्ताक तांबोळी, बिट्टू चोरमुंगे, संजय निधाने, आजीम तांबोळी, रघुनाथ नालकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सतीश ताठे, बलराज पाटील, पंकज कडू, किशोर भांड, भाजपचे योगेश गिते, सात्रळचे माजी सरपंच बाळासाहेब चोरमुंगे, रावसाहेब नालकर, वसिम इनामदार, भैय्या तांबोळी, हंबीर कडू, संजय पलघडमल, जयराम दिघे, अमोल दिघे, बापू दिघे,

अक्षय दिघे, अनिल डुक्रे, अमोल नालकर, प्रविण शेजवळ, सदस्य सागर डुक्रे, राजू पलघडमल, दादा डुक्रे, नंदू कडू, हर्षल कडू, रवि कडू, प्रसाद कडू, बाळासाहेब डुक्रे, संतोष कडू, मेजर गणेश साठे, गोकुळ मोरे आदी ग्रामस्थसह उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. लोखंडे, पो.हे.कॉ. जायभाय, ठाणगे यांना निवेदन दिले.

Ahmednagarlive24 Office