बाप-लेकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

 श्रीगोंदा : आपल्या शेतातील माती उचलून दुसऱ्याचे शेतात टाकत असल्याचे लक्षात आल्यामुळे ही माती टाकण्यास मज्जाव केल्याचा राग येऊन, बाप लेकास लोखंडी खोऱ्याने मारहाण करून डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात बाप लेक गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाजणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून, तो किरकोळ जखमी झाला आहे.

सदर घटनेबाबत अजनुज येथील संजय दत्तात्रय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष रामदास क्षीरसागर,अर्जुन रामदास क्षीरसागर,गणेश पोपट क्षीरसागर तिघे रा.अजनुज यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादी संजय त्यांचे वडील दत्तात्रय व भाऊ राजेंद्र हे तिघेही त्यांच्या अजनुज शिवारातील गट नं४३७ मधील शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते.

तेव्हा त्यांना तेथे त्यांच्या शेतातील माती गणेश पोपट क्षीरसागर हे घमेले व खोऱ्याच्या सहाय्याने भरून बाजूच्या शेतात टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांनी गणेश यांना ही आमची वडोलोपार्जित जमीन आहे, तू आमच्या शेतातील माती उचलून घेऊन जाऊ नकोस.

असे समजावून सांगत स्वत:च्या शेतातील माती उचलण्यास मज्जाव केला. त्याचा गणेश यांना राग आला त्यांनी या तिघा बापलेकांना शिवीगाळ केली व फोन करून संतोष रामदास क्षीरसागर व अर्जुन रामदास क्षीरसागर या दोघांना शेतात बोलावले.

हे दोघे शेतात आल्यानंतर त्यांनीही शिवीगाळ करायला सुरुवात केली, त्यातील संतोष याने फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात लोखंडी खोऱ्याने मारले तर अर्जुन यांनी फिर्यादीचे भाऊ राजेंद्र यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. या जीवघेण्या हल्ल्यात हे दोघे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच फिर्यादी संजय यांना देखील या लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच या मारहाण करणाऱ्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मारून टाकू अशी धमकी दिली. शेतातील माती उचलण्यास मज्जाव करण्याच्या किरकोळ कारणातून भावकीतल्याच लोकांकडून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उ

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24