अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नेवासे तालुक्यातील लेकुरवाडी आखाडा येथे मुलाला व सुनेला कुऱ्हाडीने व गजाने मारहाण केल्याप्रकरणी सोपान सुखदेव महारनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ नामदेव व वडील सुखदेव यांच्यासह सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे, कुटुंबात सामायिक बांधाचा वाद सुरू असून २५ मार्चला धाकटा भाऊ नामदेव महारनोर याचा व्याही किसन कारभारी खेमनर, अमोल किसन खेमनर (खडकी मडकी, ता. नेवासे) हे दोघे घरासमोरून सोपान महानोर यांना शिवीगाळ करत चालले होते.
शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता त्याचा राग धरून आणखी जोरजोराने शिवीगाळ करू लागले. भांडण सुरू असताना शेजारी राहणारे नामदेव सुखदेव महारनोर, नवनाथ सुखदेव महारनोर, साईनाथ नामदेव महारनोर, उषाबाई नामदेव महारनोर, सुखदेव नामदेव महारनोर (लेकुरवाडी आखाडा, ता. नेवासे) हे पळत आले.
त्यांच्या हातात कुऱ्हाडी व लोखंडी गज होते. त्यांनी किसन खेमनर व अमोल खेमनर यांना कुऱ्हाडी दिल्या. अमोल व किसन यांनी सोपान यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने तीन वार केले, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर वार करत नसा तोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नामदेव याने गजाने सोपान यांच्या डाव्या हातावर मारहाण केली. सुखदेव व उषाबाई यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोपान यांची पत्नी ताराबाई सोडवण्यासाठी आल्या असता नवनाथ, साईनाथ यांनी गजाने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले, असे सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com