अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे.
वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे.
मात्र तरी देखील शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान दिवाळी सणा निमित्त बाहेर गावी गेलेले अनेक परिवार आता आपआपल्या घरी परतत आहे परंतु बंद घर असल्याने त्यांना त्यांचे घरी चोरी झाल्याचे लक्षात येत आहे.
केडगाव भागातील अनेक भागात गेल्या काही महिन्यापासून भूषणनगर, शिवाजीनगर, लिंक रोड, वैष्णव नगर, लालनगर, एकनाथनगर, मराठा नगर या भागामध्ये घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढलेले आहे.
यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नररसेवक विजय पठारे यांनी या भागातील नागरिकासह कोतवाली पोलीस यांना दिले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved