हुश्श झाला बुवा एकदाचा ‘हा’ कार्यक्रम जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. आता सरपंच, उपसरपंच निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांची सरपंच, उपसरपंच निवडीसाठीची सभा दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. सरपंच आरक्षणानुसार नवीन सरपंच निवड होणार आहे.

जानेवारीत निवडणूक झाली निकालही जाहीर झाला.परंतु अद्याप सरपंच कोण होणार याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक निवडून आलेले उमेदवार फुटू नयेत यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत.

मात्र आता सरपंच पद निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरपंच पदाची माळ कोणाकोणा गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24