अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी अझहर शेखला मध्यप्रदेशातून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी  व फरार सराईत गुन्हेगार अझहर मंजूर शेख यांस शिवनी, मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १८/११/२०१९ रोजी पहाटेचे वेळी अहमदनगर शहरातील प्रसिध्द उद्योजक अब्दूल करीम सय्यद, रा. एस. टी. कांलनी समोर, फकीर गल्ली, अहमदनगर यांचे अज्ञात इसमांनी २५,००,०००/-रु. रकमेच्या खंडणीसाठी अपहरण केले होते.

त्याबाबत फिर्यादी सय्यद अफरोज अव्दूल करीम, वय- ४३ वर्षे, रा. फकोर गल्ली, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फियांदोवरुन गुन्हा दाखल करण्यात
आला होता.

सदर गुन्ह्याचा पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख, वय- २० वर्षे,रा. परतूर, जि- जालना यांस त्याच्या एका अल्पवयीन साथीदारांसह यापुर्वी ताब्यात घेतले होते.

गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी अझहर मंजूर शेख, रा. फकीरगल्ली, अहमदनगर हा पोलीसांना गुंगारा देवून फरार झालेला होता. तेव्हा पासून स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर तोफखाना पो.स्टे. चे पथके त्याच्या मागावर होती.

पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर हे त्यांचे पथकातील सपोनि/शिषीरकुमार देशमुख, पोहे कॉ/मनोहर गोसावी, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/संतोष लोढे, दिपक शिंदे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकॉ/मंच्छद्र बडे, सागर ससाणे, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके यांचे मदतीने आरोपी अझहर मंजूर शेख याचा शोध
घेत असताना पोनि/दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि,

आरोपी अझहर शेख हा शिवनी, मध्यप्रदेश येथे एका खेडेगावामध्ये रहात असल्याची माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी खवासा, शिवनी, मध्यप्रदेश येथे जावून आरोपीचे वास्तव्याची गोपनिय माहीती घेतली असता आरोपी रहात असलेले गांव हे पेंच अभयारण्य परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. 

आरोपी हा दिवसभर अभयारण्यामध्ये आपले अस्तित्व लपवून रात्री पिंपरवाणी, खवासा या गावामध्ये येत असल्याची माहीती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वेषांतर करुन आरोपी रात्रीच्या वेळी मुक्कामी रहात असलेल्या घराची पाहणी केली.

परंतू आरोपी अझहर शेख हा घरी येत नसल्याने दोन दिवस सापळा लावून आरोपी नामे अझहर मंजूर शेख, बय- ३५ वर्षे, रा. फकीर गल्ली, अहमदनगर यांस मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून अहमदनगर येथे आणून तोफखाना पो. स्टे. ला हजर केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24