‘बबनराव मी कायम रिचेबलच असतो’ हर्षवर्धन पाटील यांचे पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा : स्व.शिवाजीराव (बापू)नागवडे यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली.कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रपंच बापूंनी उभे केले. सहकारातही बापूंचे सिंहाच योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य सहकारी साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संस्थापक श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते.

यावेळी पाटील यांनी आयुष्यभर पुण्याचे काम करणाऱ्या माणसांनचेच पुण्यसमरण होते असे सांगितले.यावेळी सूचक वक्तव्य करत बापूंच नाव महाराष्ट्रातील जनतेच्या कायम स्मरणात राहील यासाठी खा.डॉ सुजय विखे यांच्यामार्फत मुख्यमंर्त्यांना निरोप देतो असे सांगितले.

तसेच हर्षवर्धन पाटील सध्या कुठं गायब आहेत ते नॉट रिचेबल असल्याच्या माजीमंत्री पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर देत बबनराव मी कायम रिचेबलच असतो असे सांगितले.. माजीमंत्री पाचपुते यांनी शिवाजीराव नागवडे हे सृजनशील, वैचारिक पातळी असणारे नेते होते.

बापू आणि मी राजकीय विरोधक असलो तरी आमच्यात वैचारिक मतभेद नव्हते. विकासाच्या मुद्यावर बापू नेहमी आपल्यासोबत असायचे, बापूंनी कधी राजकीय पातळी सोडली नाही. तसेच बापूंनी पक्षनिष्ठा टिकवली पण आताच्या नेत्यांची नुसती पळापळी सुरू आहे.

आ.राहुल जगताप यांनी बापूंच्या आठवणी, संस्कार सर्वांच्या मनात आहेत. माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्र्याला विधानसभेत पाठवण्याचे काम बापूंनी केल्याचे जगताप म्हणाले. खा.डॉ.सुजय विखे यांनी नागवडे हे थोर नेते होते असे सांगितले.

याप्रसंगी कीर्तनकार योगीराज महाराज पैठणकर यांचे कीर्तन झाले.या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आ.अशोक पवार, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, संपतराव म्हस्के,

नगराध्यक्ष, नगरसेवक, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,ग्रा.सदस्य यांच्यासह स्व.नागवडे यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक उपस्थित होते. यावेळी भगवान पाचपुते, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, ज्ञानदेव वाफारे, मंगलदास बांदल, दादा पाटील फराटे यांनी बापूंना श्रद्धांजली वाहिली. नागवडे कुटुंबियांच्या वतीने विठ्ठलराव नागवडे यांनी ऋण व्यक्त केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24