अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे, यामुळे बाळ बोठे समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
बाळ बोठे विरोधात नगर शहरातीलच एका विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे कि बाळ बोठे याने राहत्या घरी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. 30 डिसेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती.
बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे मात्र फरार असून गेल्या 25 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.