अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या ! अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यापूर्वीच पोलिसांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता बोठेच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा समावेश आरोपीत करण्यात आला आहे. आरोपीत नाव येताच तो पसार झाला.

बोठे याने सोमवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज लगेच त्यावर सुनावणी होती. जिल्हा सत्र न्यायाधीश नातू यांच्यासमोर सुनावणी झाली.

अटकपूर्व जामीन अर्ज येताच कोर्टाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आता पोलिसांचे म्हणणे आल्याशिवाय बोठेच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार नाही. त्यामुळे रेखा जरे खून खटल्यातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 11) सुनावणी होणार आहे.

या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून, मुख्य सुत्रधार असलेला बोठे अद्याप पोलिसांना सापडू शकलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24