अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- बाळासाहेब थोरात हे दोन वर्षाआधी भाजपमध्ये येण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्या पक्षप्रवेशाची चिंता करू नये असंही विखे पाटील म्हणालेत. राजकीय फायद्यासाठी थोरातांनी पक्षाची फरप़ड केली आणि पक्ष दावणीला बांधला.
भाजपमध्ये येण्यासाठी ते कोणत्या नेत्यांना भेटले हे मला सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात विखेंनी थोरात यांच्यावर घणाघाणी टीका केली आहे.
या आरोपावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले आमचे काही लोक तुमच्याकडे येणार आहेत हे सांगण्यासाठी भेटलो आणि तसेच घडले,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात शनिवारी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही.
सत्ता बदलली आता कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असावी,
जिल्ह्यात जे काही आव्हान येईल त्याला सामोरे जाणार असून काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहणार आहे, असे थोरात म्हणाले.