बळीराजा पोलिस दादांसाठी उदार…’इतक्या’ मोसंबी दिल्या विनामोबदला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- औरंगाबाद येथील एकाने नगर पोलिसांसाठी अडीच टन मोसंबी पाठविल्या आहेत.

अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते त्या मोसंबींचे वाटप करण्यात आले.

सध्या पोलिस कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अशा परिस्थितीत पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे त्यांना मिळणे गरजेचे आहेत.

हाच विचार करून औरंगाबाद येथील शेतकरी मुरलीधर चौधरी यांनी नगर पोलिसांसाठी स्वखर्चाने टेम्पोतून अडीच टन मोसंबी पाठविल्या.

त्या मोसंबीचे वाटप बंदोबस्त करणार्‍यांना पोलिस कर्मचार्‍यांना करण्यात आले आहे.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रांजल सोनवणे,

नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,

जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24