अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : तीन दिवसांपूर्वी भाळवणी येथील रहिवाशी असलेला जिल्हा परिषद कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
तर ग्रामपंचायतीच्या परिसरातील शंभर मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन घोषित केला होता. व ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर तीन जण असे आठ जण येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.
तीन दिवसांनंतर दि. १३ रोजी त्यातील एक जण पाॅझिटीव्ह आल्याने संपुर्ण गाव दहशतीखाली आले आहे. संपुर्ण बाजारपेठ गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली असताना
तिसऱ्या दिवशी पुन्हा ऐक जण पाॅझिटीव्ह आल्याने पुन्हा संपुर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांना दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews