कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात; आता केवळ काही पाऊले दूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी 95 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 70 हजार 4 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट) हे आता 97.12 टक्के इतके झाले आहे. दरम्यान शुक्रवारी रुग्ण संख्येत 93 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 979 इतकी झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24