अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ही आज एक गरज बनली आहे. चॅटिंग, व्हिडिओ कॉल करणे, शॉपिंग करणे यापासून ऑनलाईन पेमेंट्सपर्यंतची सेवा देण्यासाठी कंपनीने प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महत्त्वाचे फीचर्स जोडले आहेत.
म्हणजेच हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की हा केवळ वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक जीवनाचा एक भाग बनला आहे. परंतु या माध्यमातून बऱ्याचदा धोकेही निर्माण होतात. आता बँकिंग पेमेंटपर्यंतचे फीचर्स व्हॉट्सअॅपमध्ये आल्याने WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर आहे.
‘असे’ काही होतेय :- सायबर क्रिमिनल whatsapp द्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट्सअॅपवर पार्ट टाईम जॉबची ऑफर पाठवली जाते. यात घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे पार्ट टाईम जॉब करून पैसे कमावले जाऊ शकतात, असा फसवणूक करणारा मेसेज पाठवला जातो.
या जॉबमध्ये केवळ 10-30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. नव्या युजर्सला 50 रुपये बोनसही मिळेल असं लिहून त्याखाली एक लिंक देण्यात येते, ज्यावर क्लिक करून जॉईन करायला सांगितलं जातं. त्यावर क्लिक झाल्यास, बँक अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो.
या फ्रॉड मेसेजमध्ये असलेली लिंक एक मालवेयर असतो. लिंकवर क्लिक करताच, हा मालवेयर युजर्सच्या फोनमध्ये इंस्टॉल होतो. हा युजर्सचा एटीएम पीन, कार्ड नंबरसारख्या फायनेंशियल किंवा पर्सनल डिटेल्स मागतो. त्यानंतर अवैधपणे या डेटाचा वापर केला जातो. त्यामुळे सर्वानी या फ्रॉड्सपासून सतर्ग असणे आवश्यक आहे.