बीड – अहमदनगर रोडवर अपघातात तलाठ्याचा मृत्यू,निधनाने सर्वत्र हळहळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कामावरून रात्री घराकडे असताना झालेल्या अपघातात एका तलाठ्याचा मृत्यू झाला. बीड – अहमदनगर रोडवर कडा येथे शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोपट नारायण गोरे असे मयत झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील पोपट गोरे हे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत होते. वळणावर ताबा सुटल्याने कारने दोन पलट्या घेतल्या.

या अपघातात तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील रहिवासी असलेले तलाठी पोपट गोरे यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर कडा येथे शुक्रवारी (ता. 18) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील पोपट नारायण गोरे हे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत होते.

शुक्रवारी काम उरकुन ते कड्यात आले. कड्यात आल्यावर घरगुती काम उरकताना उशीर झाला. रात्री नऊच्या दरम्यान स्वतःच्या गाडीत (क्रमांक MH 16, BH 5758 ) घराकडे निघाले.

एका वळणावर येताना त्यांचा अचानक ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली.कारने रस्त्याच्या खाली जावून दोन पलट्या मारल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोरे यांनी आष्टी तालुक्यात बरीच वर्षे तलाठी म्हणून काम पाहिल्यानंतर नुकतीच त्यांची पाटोदा तालुक्यात बदली झाली होती.

या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शनिवारी (ता. 19) सकाळी शेरी बुद्रूक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांसह जनसमुदाय उपस्थित होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24