अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने संगमनेर तालुक्यात आज बंद पुकारण्यात आला आहे.
आज पाळण्यात येणाऱ्या बंद बाबतची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात व शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे, दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन ११ दिवसांपासून सुरू आहे. शेतकरी वर्गाला सन्मानपूर्वक वागणूक देत केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तातडीने रद्द करावेत,
यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनेदेखील सक्रीय पाठिंबा दर्शवला असून शहर व तालुका मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved