भाऊसाहेब कांबळेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर: काँग्रेसला जय महाराष्ट्र करून राजीनामा दिलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.

विधानसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे, मागील निवडणुकीत सेनेकडून निवडणूक लढलेले लहू कानडे, काही महिन्यांपूर्वी सेनेत प्रवेश केलेले माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांचीही व्यूहरचना सुरू होती.

कांबळे यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली. नाराज झालेले उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांच्यासह सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांना उमेदवारी दिल्यास पदाचे राजीनामे देण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे कांबळे यांच्या प्रवेशाचे काय होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी ज्यांना राजीनामे द्यायचे त्यांनी खुशाल द्यावेत, असे सांगितले होते. अखेर कांबळे यांच्या सेना प्रवेशाला ७ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला.

मातोश्रीवर जाऊन त्यांनी भगवा हाती घेतला. यावेळी संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, शहरप्रमुख सचिन बडदे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कांबळे यांचे सेनेकडून तिकीट पक्के समजले जात असले, तरी डॉ. चेतन लोखंडे, लहू कानडे, रामचंद्र जाधव हे अजूनही आशावादी आहेत. मातोश्रीवर झाला प्रवेश माजी आमदार भाऊसाहेब कांब‌‌ळे यांनी शनिवारी मंुबईत सेनेत प्रवेश केला.

नाराज पदाधिकारीही कांबळे यांच्यासोबत भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिल्यास आपण पदांचे राजीनामे देऊ, असा इशारा देणारे राजेंद्र देवकर, दादासाहेब कोकणे आदी कांबळे यांच्या सेनाप्रवेशाच्या वेळी मातोश्रीवर उपस्थित होते.

पक्षाने त्यांची नाराजी दूर केल्याचे त्यांच्या राजीनाम्यांच्या इशाऱ्यालाही पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे. संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे व खासदार लोखंडे हेही उपस्थित राहिल्याने पक्षाने सर्वांची मोट बांधल्याचे चित्रही समोर आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24