अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार येथील गौतमनगर मित्र मंडळा तर्फे त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
भीम वंदना घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आरपीआय (आठवले) आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, मयूर सोनावणे (मेंबर), आरपीआयचे भिंगार युवक शहराध्यक्ष अमित काळे, धम्ममित्र दिपक अमृत, सचिन धिवर, नागरदेवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवराज पाखरे,
बंटी धीवर, सूरज गायकवाड, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार, सिद्धार्थ उबाळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष सारसर, प्रविण वाघमारे, सुनिल साळवे, विलास साळवे, लखन आढाव, नगर तालुका संघटक महादेव भिंगारदिवे, सागर पाडांगळे, जगदीश साळवे, आकाश आरू आदिंसह युवक उपस्थित होते.
मंगेश मोकळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून समता, स्वातंत्र्यता व बंधुत्वाची मुल्ये समाजात रुजवली. गावकुसा बाहेरच्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा तर मनुष्याला मनुष्य म्हणून राहण्याचा अधिकार घटनेने दिला. दीन दलितांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
या महामानवाच्या विद्वत्तेने घटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही अवतरली असल्याचे त्यांनी सांगितले. गौतमनगर मित्र मंडळा तर्फे चौकात अभिवादनासाठी ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले. अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम नगर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved