अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात ट्रकची बसल्याने तो जागीच ठार झाला.ही घटना नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल कुबेरनजिक साई टायर्सजवळ असलेल्या ओढ्याजवळ काल रविवारी (दि.15) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेची खबर पत्रकार सुनील भुजाडी यांनी वनखात्याला दिल्यानंतर वनपाल लोंढे व सचिन गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविला.
काल रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या नगर-मनमाड महामार्गावरील ओढ्याजवळील काटेरी झुडूपातून निघून महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. यात त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com