अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे,
यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२ झाली आहे.
अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने झाला होता ऍडमिट केले होते.
तसेच अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील पंचवीस वर्षे युवकाला ही कोरोनाची बाधा झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील तीस वर्षीय युवक कल्याण येथून येऊन जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. कल्याण येथे फायर ब्रिगेडमध्ये तो कर्मचारी होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
घुलेवाडी संगमनेर येथील 35 वर्षीय युवक बाधित. कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील 32 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तो घाटकोपरवरून आला होता.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५२
(महानगरपालिका क्षेत्र २५, अहमदनगर जिल्हा ७७, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४०)
जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ६७ (+०२संगमनेर)
* एकूण स्त्राव तपासणी २५०७
निगेटीव २२४२ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १७ अहवाल बाकी ७१
जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३
*श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले.
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews