Big Breaking: अहमदनगर मध्ये दारू दुकाने केली खुली ! ‘या’ आहेत अटी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  जिल्ह्यातील मद्यविक्री करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मद्यविक्री केली जाणार आहे. 

ग्रामीण भागातील मद्य विक्रीची सर्व दुकाने व शहरातील भागातील कंटेनमेंट झोनवगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू राहतील. 

परवानगी देत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वेगवेगळ्या अटी घातल्या आहेत. एकाचवेळी दुकानासमोर पाचपेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत, सोशल डिस्टसिंग व मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

मद्य खरेदीसाठी आलेल्या सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, ताप असणार्‍या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, असा आदेश विक्रेत्यांना देण्यात आलेला आहे.

दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही. दारू दुकानांच्या आवारात थुंकण्यास मनाई असेल, असेही आदेशात म्हटले आहे. दिलेल्या सूचनांचे योग्य पालन न केल्यास संबंधित दुकानदार व ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,

असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे दारू मिळणार असली तरी विक्रेते व ग्राहकांना अलर्ट राहावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24