बिग ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाउन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  महाराष्ट्रात लॉकडाउन!, कलम १४४ लागू,अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गोष्टी बंद रहाणार. लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू.

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येतील.  अगदी शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवली जाणार असून बाहेर पडणाऱ्यांना संयुक्तिक कारण देऊनच बाहेर पडावं लागणार आहे.

 

दरम्यान कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने कालच मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला आहे.

अशी आहे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी :- पिंपरी चिंचवड  – 12 पुणे  – 15 मुंबई – 25 नागपूर- 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 3 कल्याण – 4 अहमदनगर – 2 रायगड – 1 ठाणे – 1 उल्हासनगर – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1

 

मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे
  • *आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४* *कलम लागू*
  • आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.
  • जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
  • महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
  • रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.
  • जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
  • बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
  • शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
  • आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
  • ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
  • चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
  • ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल
  • सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद
  • अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती
  • पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24