बिग ब्रेकिंग : ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली. आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे.

आज २५ मे रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे फैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनसाठी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही पटेल यांनी म्हटले आहे.

शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.

त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24