अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली,
मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी सातत्याने करत होते.
या मागणीनंतर प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे खासदार सुजय विखे यांनी राजीनामा देतो, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. दरम्यान,खासदार सुजय विखे यांनी रविवारपासून पारनेर तालुक्यापासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. यात जनजागृतीची मोहीम घेतली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला होता.
मात्र आता त्यांची भूमिका बदलली गेल्यामुळे विखे यांनी समन्वयाची भूमिका ठेवली असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता सरकारने कोविड संदर्भात नियम व अटी दिलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे अशी सूचना दिली. एकीकडे नियम मोडणाऱ्या विरोधात दंड, वेळप्रसंगी थेट गुन्हा दाखल करण्याची भूमिका प्रशासनाने हाती घेतल्याचे दिसते.
दुसरीकडे मात्र खासदार विखे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यात अनेक मोठ्या मोठ्या बैठकाचे आयोजित केल्या आहेत.या अनेकांनी सोशल डिस्टनसिंग नियंमाचा फज्जा उडवले असल्याचे चित्र आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सुरक्षित अंतर नसल्याचे दिसत आहे.
अगोदर जमीन देण्यास विरोध, नंतर खा.विखेनी घेतलेली समन्वयाची भूमिका, या दुहरी भूमिकेमुळे नेमकी खासदार सुजय विखेंना काय सध्या करायचे? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातच विखे यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडत सुरू केलेल्या बैठकीबाबत प्रशासन काय कारवाई करते, याकडे अहमदनगरकरांचे लक्ष लागून आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved