अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या अजूनही कंट्रोलमध्ये येण्याचे चिन्हे दिसत नाही.
आज (रविवार) एकाच दिवशी जिल्ह्यात सकाळी बारा आणि संध्याकाळी सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित आहेत.
नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थ नगर भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासने नगर येथील ६२ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण
श्रीगोंदा शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही बाधित. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या आले होते संपर्कात.
अहमदनगर शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर, सावेडीच्या रासनेनगर येथील ३ जण व श्रीगोंदा येथील ३ जणासह अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी ६ जण ‘कोरोना’ पॉजिटिव आढळले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह केसेस: ४५
जिल्ह्यातील बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या: २४५
जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या: ३०२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews