अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगलचे नेटवर्क ठप्प झाले आहे. तसेच जीमेल आणि यूट्यूबच्या सेवाही पूर्णपणे बंद झाल्या आहेत.
ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल,
गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत. नेमकं कारण काय? यूट्यूब आणि जीमेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.
देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत आहे. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद आहेत. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह,
गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प आहेत. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत असून, या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.