मोठी बातमी : भाजपचे ‘ते’ नगरसेवक अपात्र !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ६ मधून ७६ मतांनी निवडून आलेले नगरसेवक आसाराम ऊर्फ अशोक गुलाब खेंडके यांचे पद नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४४(१)(ई) नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले.

भाजपने खेंडके यांना एक वर्ष उपनगराध्यक्षपदी संधी दिली. उपनगराध्यक्ष झाल्यानंतर खेंडके यांनी गट क्रमांक २१८८(३)(अ) मध्ये नगरपालिकेची परवानगी न घेता,

तसेच ती जागा बिगरशेती न करता शेड उभारून ट्रॅक्टर व टेलरचे वर्कशॉप सुरू केले होते. वीजही अनधिकृतपणे घेतली होती.

पराभूत उमेदवार शेख यांनी खेंडके यांचे विरोधात नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार करत त्यांना पाच वर्षे अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यावर २२ सप्टेंबरला सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ऑक्टोबरला खेंडके यांना अपात्र ठरवण्याचा आदेश काढला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24