अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे.यात नगर शहरातील ०६ जणांचा समावेश आहे.
अहमदनगर ही जिल्ह्याची बाजारपेठ आहे. अहमदनगर शहरात मागील दोन ते तीन दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे रविवार ते मंगळवार तीन दिवस शहरातील व्यापार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय
दि अहमदनगर आडते बाजार मर्चन्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव संतोष बोरा व राजेंद्र चोपडा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनावर अधिक ताण येत आहे. आज पर्यंत प्रशासनाने व्यापार्यांना भरपूर सहकार्य केले आहे.
ही बाब लक्षात घेऊन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मार्केटयार्ड, आडतेबजार, दालमंडई, तपकिरगल्ली, दाणेडबरा व जवळील परिसरातील व्यापार पेठ रविवार दि.28 जून ते मंगळवार दि.30 जून पर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे. व्यापार्यांनी स्वयंफुर्तीने तीन दिवसाचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.