मोठी बातमी ! शेतकऱ्यांचा १६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big News : कृषी उत्पादित शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा तत्काळ लागू करणे व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी येत्या १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे.

याबाबत भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी अधिकृत घोषणा केली. विविध शेतकरी संघटना व व्यापारी आणि वाहतूकदार सुद्धा या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चा (बीकेयू) सह अनेक शेतकरी संघटना यात सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांनी बंदच्या दिवशी त्यांच्या शेतात जाऊन काम करू नये. यापूर्वीच्या बंदमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात काम केले नव्हते. त्याचप्रमाणे १६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसाठी अमावास्या असणार आहे. या असहकारातून देशात मोठा संदेश जाईल, असे टिकैत म्हणाले.

१६ फेब्रुवारीला व्यापाऱ्यांनी शेत मालाची खरेदी करू नये. शेतकरी व कामगारांच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनीही त्यांची दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन टिकैत यांनी केले. दरम्यान, किमान हमी भावाचा कायदा करणे,

बेरोजगारी कमी करणे, अग्निवीर योजना रद्द करणे आणि पेन्शन योजना आदी मागण्यांसाठी आम्ही बंदची हाक दिली आहे. १६ फेब्रुवारीचा संप हा एकट्या शेतकऱ्यांचा नाही. यात इतर संघटनासुद्धा सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.