अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) पुन्हा एकदा मोटार वाहन कायद्यान्वये ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), वाहन फिटनेस सर्टिफिकेट इत्यादी आवश्यक कागदपत्रांची वैधता वाढविली आहे.
आता हे डॉक्युमेंट 31 मार्च 2021 पर्यंत वैध असेल. म्हणजेच, एखाद्याचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर मोटार वाहन दस्तऐवज एक्सपायर होत असल्यास ते अवैध मानले जाणार नाहीत. देशभरात कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक परिस्थिती व आताची सद्यस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 30 मार्च आणि 9 जून रोजी एक आदेश जारी करून मोटार वाहनांच्या कागदपत्रांची मुदत वाढवली होती. 9 जून रोजी जारी केलेल्या आदेशात ती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आणि त्यानंतर 24 ऑगस्ट 2020 रोजी जारी केलेल्या आदेशानंतर ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली.
असे म्हटले होते की वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, सर्व प्रकारच्या परवानग्या, लाइसेंस, रजिस्ट्रेशन किंवा इतर कोणत्याही वाहन कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध मानले जावे. आता हे डॉक्युमेंट 31 मार्च 2021 पर्यंत वैध असतील.
राज्य प्रशासनांना सूचना जारी केल्या :- मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रशासनांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड 19 चा प्रसार थांबविण्याची गरज लक्षात घेऊन मोटर व्हीकल्स एक्ट 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 शी संबंधित कागदपत्रे 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली पाहिजेत, असे या सल्लागारात नमूद केले आहे.
या नियमानुसार ती सर्व कागदपत्रे यात कव्हर होतील ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर समाप्त झाली आहे किंवा 31 मार्च 2021 पर्यंत समाप्त होईल.