ब्रेकिंग

मोठी बातमी ! एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाच्या पावित्र्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- वेळोवेळी सरकारसोबत वाटाघाटी करूनही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता,घरभाडे, वेतवाढ देत नाही, त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्यसशानात विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही,

येत्या 30 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करून शासनात विलीनीकरण न केल्यास राज्यातील सर्व एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारण्यात येईल.

एक नोव्हेंबर रोजी सदस्यांचे मतदान घेऊन याबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव इथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप लबडे या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

संपाबाबत शासकीय नियमांची अमलबाजवणी साठी लोणावळा इथे बैठक घेण्यात येऊन संपाबाबत एक नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.

मात्र आता शासनात विलीनीकरण आणि राज्य शासनाची मुद्रा मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा मेळाव्याच्या निमित्ताने घेण्यात आला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगार संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने राज्यसरकार पुढे हे संकट असून यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाकडे आता लक्ष असेल.

Ahmednagarlive24 Office