मोठी बातमी : केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले, बंदुकीचा धाक दाखवून…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची दहशत असून सर्वसामान्य जनता आणि प्रशासन याविरुद्ध लढा देत आहे. परंतु दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामे सुरु असून चोऱ्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

बुधवारी रात्री अहमदनगर शहराजवळील केडगाव सशस्त्र दरोड्याने हादरले. चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून  मारहाण करत पाच तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले.

या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी रमाकांत महादेव पराळे (वय 55) यांनी फिर्याद दाखल केली असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर पराळे यांच्या घरात घुसले. यावेळी घराबाहेर झोपलेल्या पराळे यांच्या मेव्हण्यास बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केली.

दुसऱ्या दरोडेखोरांने पराळे यांना बंदुकीच्या मागील बाजूने डोक्यात व पोटात मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन काढून घेतली यावेळी अणखी एका दरोडेखोरांनी त्यांच्या पाठीला चाकू लावून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलीस प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून  होत आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24