अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वेग मंदावला आहे. तरीही कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. या संक्रमणाच्या विळख्यातून कोरोनायोद्धा देखील सुटू शकलेले नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा येथील कारागृहात असणाऱ्या 36 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार येथील पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
यामध्ये 7 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच 45 जणांची तपासणी बाकी आहे. कैद्यांचीतपासणी केली असता 36 कैदी कोरोनाबाधित आढळून आले होते.
याच आरोपींच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी व जेवण देणारे कामगार यांची देखील तपासणी करून घ्यावी, अश्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी केल्या.
त्यानुसार 25 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 25 मधील सात कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 40 कर्मचाऱ्यांची तपासणी होणे
बाकी असल्याने पोलीस ठाणे व त्यांच्याशी संबंधित कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या चिंतेत भर पडली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची देखील तपासणी होणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved