अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपुर तालुक्यात करोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला श्रीरामपुर शहर तसेच परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून येत होते.
परंतु आता तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांत श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
म्हणूनच आज प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत संपूर्ण श्रीरामपुर शहर रविवार १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या प्रचंड वाढल्याने अखेर प्रशासनाला लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. राहुरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून बाधितांचा वेग वाढला आहे.
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन हतबल झाले होते. करोनाची साखळी तोडण्यासाठी श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन करून,
जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेरीस प्रशासन, व्यापारी, विविध संघटना आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत श्रीरामपुर शहर १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved