अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड येथून दत्ताराम राठोड हे नगरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदलून आले आहे.
जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची बदली झाली आहे.
त्यांना नवीन पदस्थापना प्रतिक्षेत आहे. मिटके यांच्या जागी नगर शहर पोलिस उपअधीक्षक म्हणुन गडचिरोली येथून विशाल ढुमे यांची बदली झाली आहे. कर्जत पोलिस उपअधीक्षक पदी पुणे ग्रामीण येथून अण्णासाहेब जाधव बदलून आले आहेत.
तर कर्जतचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांची जिल्ह्यातच शिर्डी उपविभागात बदली झाली आहे. शेवगावचे पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर उपविभागात बदली झाली आहे.
त्यांच्या जागी शेवगाव उपविभागात लातुर येथून सचिन सांगळे बदलून आले आहेत. शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची बदली नंतरची पदस्थापना प्रतिक्षेत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved