अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
चेन्नईत उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएलसाठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाईल.
दरम्यान आयपीएल २०२१ मध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. एकूण ५६ सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी १० सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी ८ सामने होतील.
यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला ६ स्टेडियमपैकी ४ स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल.
या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3. 30 वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
IPL चे वेळापत्रक पुढील प्रमाणे –