अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांत दिवसात कोरोनाच्या संकटात सुमारे अडीच लाख लाख भाविकांनी साईंचे दर्शनच लाभ घेतला.
यावेळी भाविकांनी साईबाबांच्या झोळीत तब्बल 3 कोटी 23 लाख 98 हज़ार 208 रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले आहे . लॉकडाउननंतर प्रदीर्घ काळानंतर साईमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात
आल्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी परिश्रम घेऊन करोनाच्या संकटाचा मुक़ाबला करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना साईमंदीर परिसरात केल्या आहेत.
15 डिसेंबर ते 28 डिसेंबर या काळातील 14 दिवसात साईबाबा मंदीरात तब्बल अडीच लाख भाविकांनी शिर्डीत येवून साईंच्या चरणी नतमस्तक होत साईंच्या झोळीत विक्रमी दानही अर्पण केले.