अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूयुचे संकट ! मृत कावळ्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून देश व अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट होते आजच जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरवात ही झाली मात्र तोच आता बर्ड फ्लूयुचे संकट ओढवले आहे कारण श्रीगोंदा तालुक्यातील एका मृत कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान बर्ड फ्ल्यूचं संकट आता राज्यभर पसरलं आहे. राज्यातील काही ठिकाणी कोंबड्याना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रशासन अ‍ॅलर्ट झालं आहे.त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

नगर तालुक्यातील निंबळक व आठवड गावात कोंबड्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. निंबळकमध्ये 46 तर आठवडला 105 अशा 151 कोंबड्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. नगर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी निंबळक आणि आठवड गावात पोहचले आहेत.

निंबळकमध्ये ज्या ठिकाणी 46 कोंबड्या मेल्या त्या आसपासच्या एक किलोमीटर परिसरात या प्रकारची एकही घटना घडलेली नाही. हाच काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवड आणि निंबळक गावात पशुसंधर्वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी सुरू केली आहे.

निंबळक नगर शहरालगत असून आठवड 25 किलोमीटर अंतरावर आहे. बर्ड फ्लूची धसका असतानाच नगरजवळच घडलेल्या या घटनांनी नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24