अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला. याचदरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
मात्र पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे,
हे पाहण्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनला आलो होतो. मात्र पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं. कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही.
पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved