विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारेंनी 30 जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. अण्णांचे प्रश्न नेमके काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन या तिन्ही नेत्यांनी त्यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

अण्णा हजारे यांनी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर 30 जानेवारीला उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वसानांची आठवण करुन देण्यासाठी हे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी मागील 58 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरयाणा या राज्यांमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आज भाजपच्या नेत्यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला.

अहमदनगर लाईव्ह 24