श्रीगोंदा : भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे
निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात पक्षाच्या नेत्यांना निशाणा बनवत निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांच्याबाबतही नाराजी व्यक्त केली.
आजपर्यंत मोठ्या नेत्यांनी पक्षात ये – जा केली पण या नेत्यांनी कधीही निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. नेत्यांमुळे निष्ठावंतांची फरफट होत आहे. या सर्व गोष्टींची कल्पना असताना ही पालकमंत्री राम शिंदे, ख़ासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी लक्ष दिले नाही.
त्यामुळे या निवडणुकीत वेगळा विचार करणार असून , प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे काम करायला आम्ही तयार आहोत. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी देवराव वाकडे, माजी तालुकाध्यक्ष राजेद्र मोटे, बाजार समितीचे संचालक नंदकुमार कोकाटे, राजेंद्र औटी , राहुल भंडारी , साहेबराव रासकर , अरुण जगताप , बाळासाहेब बनकर , शांताराम वाबळे, बळिराम बोडखे, सचिन गायकवाड, सुभा कांबळे, गंगाराम दरेकर, मुक्तार शेख, गोरख आळेकर, दत्तात्रय जामदार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.