श्रीरामपूर ;- दुसऱ्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , गावातील भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला. घरातील आर्थिक व्यवहाराविषयी त्याने भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले. यावरुन भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात वाद निर्माण झाले.
या वादास कारणीभूत गावातीलच काँग्रेसचा तो कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकाऱ्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो कार्यकर्ता सापडला नाही.
अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकाऱ्याने ‘ आमच्या घरात भांडणे लावतोस काय ?’अशी विचारणा करून त्या कार्यकर्त्यांची चांगलीच धुलाई केली. कशीबशी सुटका करून त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला.