शिर्डी :- शहरातील साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ५५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिलेबाबत काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.