बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवले आहे.

सुशांतने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे.आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

सुशांतने एवढ्या टोकाचं निर्णय का घेतला? हाच प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. सुशांत सिंह राजपूज ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचला होता.

2016 साली प्रदर्शित झालेल्या भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील सुशांतची भूमिका फार गाजली होती. 

 ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24