घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २८ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल चंद्रकांत वसंत मोरे (वय-२८ रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) हे दि.६ डिसेंबर रोजी घर बंद करून, बाहेरगावी गेले होते.

याचा फायदा चोरट्यांनी उठवत दि.६ते ८ डिसेंबर दरम्यान बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात असलेले एक लाख २८ हजार ७०० रूपयेचे दागिने लंपास केले.

मोरे हे दि.८ डिसेंबरला दुपारी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी (दि.९) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी हे करत आहेत.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24