अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : आज सकाळी जिल्ह्यातील २० रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत.
या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये अकोले ०७, नगर महापालिका क्षेत्रातील ०७, संगमनेर ०४,
राहाता ०१ आणि श्रीगोंदा येथील ०१ अशा २० व्यक्तींचा समावेश आहे.
यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६१ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews