अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पोलिस ताब्यात असलेला आरोपीला घेऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयात जात असताना
पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तो पसार झाला. पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पारनेर पुरुष ठाण्यातील भादंवि 363 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या गुन्हातील आरोपी
प्रविण उर्फ मिठू पोपट गायकवाड याला तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे
यांच्या कडून अटक करण्यात आली होती.
पोलिस कस्टडी रिमांडमध्ये असलेला त्याला बोत्रे यांनी काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास
उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय पारनेर येथे छातीत त्रास होत असल्याने उपचारासाठी नेले होते.
त्याने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पलायन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com