ब्रेकिंग : आदर्शगाव लोहसरच्या सरपंचाना मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनचे धान्य वाटपावेळी झालेल्या वादातून लोहसरचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल (अनुराग) जगन्नाथ गिते यांना मारहाण झाली.

ही घटना मंगळवारी सकाळी घडली. विरोधी गटाचे गंगाधर ऊर्फ शिवाजी वांढेकर हे देखील या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

सरपंच अनिल गिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,माझे वडील जगन्नाथ गिते यांच्या नावावर लोहसर येथे स्वस्त धान्य दुकान आहे. मंगळवारी सकाळी दुकानात धान्य घेण्यासाठी शंभर, दोनशे जनांची गर्दी जमली.

गर्दी करू नका व सुरक्षित अंतर ठेवून उभे रहा, असे सांगितल्याचा राग मनात धरून मला कुऱ्हाड, गज, काठ्यांनी जबर मारहाण केली.

अनिल गिते यांच्या फिर्यादीवरून रावसाहेब माधव वांढेकर, महादेव लक्ष्मण वांढेकर, शिवाजी साहेबराव वांढेकर, दिगंबर दामोदर वांढेकर, महेश रावसाहेब वाढेकर, अमोल भाऊसाहेब वांढेकर, वैभव मनसुख वांढेकर, किशोर दामोदर वांढेकर,

संभाजी शिवाजी वांढेकर, देवेंद्र बाळासाहेब गिते, सुखदेव शामराव गिते, भरत सावळेराम गिते, शिवाजी रामभाऊ वांढेकर, अनिल बाबासाहेब वांढेकर, संजय जिजाबा वांढेकर (सर्व लोहसर) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

 वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24