ब्रेकिंग : ‘त्या’ मुलाच्या आईसह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन वर्षांपासून बळजबरी मद्यपान करत असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर आज गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन मुलाचा छळ करणारे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे व अग्नीशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह

महापालिकेतील एक कर्मचारी व सदर अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात आज संध्याकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी तसेच अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह काही कर्मचारी घरात घुसून

दारू पीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता या कथित घटनेत त्या मुलाने आपणास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले  होते.

आज याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलानेच फिर्याद दाखल केली आहे़ महापालिकेतील दोन जबाबदार अधिकाºयांविरोधात गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे़.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24