अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज विविध गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता या प्रकरणाला आता आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे.
आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. याप्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी आर्थिक आरोपही केल्यामुळे आता या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) लक्ष घातले आहे. ईडीने सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेले आरोपपत्रातील माहिती मागविली होती.
बिहार पोलिसांकडून FIR कॉपी ईडीला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले, त्यांची चौकशी ई़डीकडून केली जाणार आहे.
बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते.
त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसंच सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती.
आता ईडीने याप्रकरणात हस्तक्षेप केल्याने एक वेगळा ट्विस्ट याप्रकरणाला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com